पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचे शनिवारी दिवसभरात 20 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 27 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 6 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 85 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे.
आज दिवसभरात 199 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 276 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 68 हजार 287 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.