पुणे : अपहरण करून ताम्हिणी घाटात गोळी झाडून एकाचा खून | पुढारी

पुणे : अपहरण करून ताम्हिणी घाटात गोळी झाडून एकाचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे परिसरातून अपहरण झालेल्या एकाचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवस ताम्हिणी घाटाचा परिसर पिंजून पोलिसांनी शनिवारी दुपारी अखेर या घटनेचा छडा लावला. आर्थिक वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गजानन हवा (वय. 38) असे खून झाल्याचे नाव आहे.

तुम्हाला 360 रुपयांची सिमेंटची गोणी 260 रुपयांना मिळेल म्हणत वकिलाला साडेसहा लाखांना गंडा

बुधवारी हवा याचे अपहरण झाल्याचा गुन्हा वारजे पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान हवा याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्याची बॉडी मिळून येत नव्हती. तसेच हवा याचा मोबाईल देखील बंद लागत होता. यावेळी पोलिसांनी हवा याच्या सोबत गेलेल्या दोघा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हवा याचा खून करून त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात पडल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने ताम्हिणी घाटाचा परिसर पिंजून हवा याचा मृतदेह शोधून काढला.

Back to top button