पुणे : भाटघर धरणात पाच महिला बुडाल्या, चौघींचे मृतदेह सापडले | पुढारी

पुणे : भाटघर धरणात पाच महिला बुडाल्या, चौघींचे मृतदेह सापडले

सारोळा : पुढारी वृत्तसेवा भोर तालुक्यातील नऱ्हे गावाचा हद्दीत भाटघर जलाशयात गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी उतरलेल्या पाच विवाहिता बुडाल्या. त्यातील चार महिलांचे मृतदेह सापडले आहेत. बुडालेल्यांमध्ये चार सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या वहिनीचा समावेश आहे. तर त्यातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या वहिनीचा मृतदेह सापडले आहेत.

खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा. बावधन, पुणे), मनिषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी रा. संतोषनगर हडपसर, पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा. नऱ्हे, ता. भोर) अशी या पाच जणींची नावे आहेत. यातील मनिषा रजपूत यांचा मृतदेह अद्यापही हाती न लागल्याने शोधकार्य सुरू होते.

नऱ्हे (ता. भोर) येथील हरीभाऊ रामचंद्र चव्हाण यांच्या चार विवाहित मुली दोन दिवसापुर्वीच पुजेसाठी आल्या होत्या. गुरुवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान या चौघी व चव्हाण यांच्या सून मोनिका रोहित चव्हाण या भाटघर जलाशयात पोहण्यासाठी गेल्या. परंतु सायंकाळी पाच वाजले तरी त्या घरी परत न आल्याने नातेवाईकानी जलाशय परिसरात शोध घेतला असता ही घटना निर्दशनास आली.

यावेळी खुशबू रजपूत, चांदणी रजपूत, पूनम रजपूत आणि मोनिका चव्हाण या धरणात मृतावस्थेत आढळून आल्या. तर मनिषा यांचा शोध सुरू होता. भोर येथील भोई समाज व भोर सह्याद्री रेसक्युस जवान शोधकार्य करीत आहेत. घटनास्थळी राजगडचे पोलीस निरिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शन खाली सहायक निरिक्षक नितीन खामगळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, नितीन खामगळ व सह्याद्री टीम यांचे शोध कार्य चालू होते.

हेही वाचलतं का?

Back to top button