Law of Hoarding| होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापणार

आजही रेल्वेच्या हद्दीत ४५ अनधिकृत होर्डिंग्ज आहेत.
Law of Hoarding
होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा File Photo
Published on
Updated on

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या राज्य सरकारने आता जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Law of Hoarding
Virat Kohli Dance : विराट-अर्शदीपचे भांगडा सेलिब्रेशन! ‘तुनक-तुनक’ गाण्यावर लुटली मैफील

याबाबत तज्ज्ञांची नावे, काही सूचना आल्यास त्याचा स्वीकार करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी अनधिकृत होर्डिंगसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. आजही रेल्वेच्या हद्दीत ४५ अनधिकृत होर्डिंग्ज आहेत.

Law of Hoarding
Shaktipeeth Highway| शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

महापालिका म्हणते आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. पण दर महिन्याला पाकिट घ्यायला त्यांचा संबंध येतो. मग सरकार त्या होर्डिंगवर काय कारवाई करणार, सरकार धोरण तयार करत असताना त्या समितीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा कोणी प्रतिनिधी आहे काय, तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणार काय याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news