पुणे : वकिलाचा खून करणारे चौघे ४८ तासांत जेरबंद ; पौड पोलिसांची कामगिरी | पुढारी

पुणे : वकिलाचा खून करणारे चौघे ४८ तासांत जेरबंद ; पौड पोलिसांची कामगिरी

पौड : पुढारी वृत्तसेवा : पौड पोलीस ठाणे हद्दीत जमिनीच्या व्यवहारवरून वकिलाच्या खुनाच्या गुन्ह्यांतील चार संशयित आरोपींना ४८ तासांत पौड पोलिसांनी गजाआड केले. विक्रांत सुभाष कांबळे (वय २२), पवन दत्ता हनवते (वय २२), इरफान सफीउल्ला खान (वय २३) आणि प्रकाश बंडू कांबळे (वय ५२, सर्व रा. कासारआंबोली, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पौड पोलीस ठाण्यात कोथरूड येथील वकील मिलिंद दत्तात्रय शिवणकर (वय ५८) हे बेपत्ता झाल्‍याची तक्रार दाखल झाली होती. संबंधित तक्रारीवरून विक्रांत कांबळे यांच्याकडे चौकशी करण्‍यात आली. यावेळी त्याने व त्याच्या साथीदाराने हरवलेल्या व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह अतवण (ता. मावळ, जि. पुणे) गावच्या हद्दीत टाकून दिल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश येमूल, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हवालदार नागटिळक, पोलीस हवालदार संदीप सकपाळ, पोलीस हवालदार शेडगे, पोलीस नाईक राँकी देवकाते, पोलीस नाईक सिध्देश पाटील, अनिकेत सोनवणे, काळे, राजेश गायकवाड, पोलीस जवान साहिल शेख, सागर नामदास यानी केला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड करीत आहेत.

हेही वाचलंत का ?

Back to top button