गुजरातची जांभळे ट्रॅव्हल्सने पुण्यात | पुढारी

गुजरातची जांभळे ट्रॅव्हल्सने पुण्यात

शंकर कवडे

पुणे : तुरट-गोड चवीच्या गुजरातच्या जांभळांना लहरी हवामानाचा फटका बसल्याने जांभळांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यात इंधन दर वाढल्याने गुजरात येथील जांभळे ट्रॅव्हल्सने थेट स्वारगेट, पद्मावती, कात्रज भागात दाखल होत आहेत.

गडचिरोली : शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस व त्यानंतर अतिउष्णतेमुळे झाडांना लगडलेली जांभळे गळून गेली. पहिल्या टप्प्यातील उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जांभळांचा हंगाम तब्बल 20 ते 25 दिवस उशिराने सुरू झाला. फळे कमी निघाली. त्यात वाहतूक खर्चात वाढ झाल्याने शेतकर्‍यांनी 18 ते 22 किलोच्या क्रेटने टेम्पोतून जांभळे बाजारात पाठविण्याऐवजी 12 ते 15 किलोंच्या क्रेटमधून ट्रॅव्हल्सने पाठविण्यास सुरुवात केली. एरवी 80 ते 100 क्रेटमधून होणारी बाजारातील आवक 20 ते 25 क्रेटवर आली आहे.

धक्कादायक! तेलंगणात महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार; नराधमाला अटक

घाऊक बाजारात दहा किलो जांभळांना 1500 ते 2500 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 250 ते 350 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ट्रॅव्हल्ससह रेल्वेनेही जांभळे बाजारात दाखल होत आहेत. मात्र, रेल्वेने येणार्‍या मालाची हाताळणी मोठ्या प्रमाणात झाल्याने हा माल ताजा व दर्जेदार राहत नाही, तर ट्रॅव्हल्सने येणारा माल अधिक दर्जेदार राहतो, असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

नाशिक : चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, सगळेच झाले अवाक

उत्पादन कमी असल्याने ऐन हंगामात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 मेनंतर दुसर्‍या टप्प्यातील जांभळे गुजरात येथून थेट मार्केट यार्डात दाखल होतील. आवक वाढल्यानंतर दरातही घसरण होईल.

– शिवाजी भोसले, जांभळाचे व्यापारी

Back to top button