पुणे : बारमध्ये गोळीबार करणारे गुन्हेगार जेरबंद | पुढारी

पुणे : बारमध्ये गोळीबार करणारे गुन्हेगार जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव बसस्थानकाशेजारील हाॅटेल कपिल बियर बारमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून, दहशत माजवून व गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील गोळीबार केलेला मुख्य आरोपी अभिषेक ऊर्फ पप्पू कोळी याला पोलिसांनी वापी (गुजरात) येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

Ruturaj Gaikwad : गायकवाड असेल CSK चा पुढचा कर्णधार! माजी क्रिकेटरचे भाकीत

नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीत दि. १० मे रोजी रात्री ११च्या सुमारास हॉटेल कपिल बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होऊन वाद विकोपाला जाऊन एका गटाकडून चाकू, तर दुसर्‍या गटाकडून पिस्तूल काढून फायरिंग केले गेले होते. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. यामध्ये प्रथम तपासात पोलिसांना एक अल्पवयीन व इतर दोन आरोपी मिळून आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी भेट देऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिस ठाणे यांची संयुक्त तपास पथके बनवून तपासासाठी विविध ठिकाणी पाठविण्यात आले.

Monsoon : तयारीला लागा! मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी मनीश ऊर्फ मन्या विकास पाटे (वय २५, रा. डिंबळेमळा नारायणगाव, ता. जुन्नर), आकाश ऊर्फ बाबु दिलीप कोळी (वय २१, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर, मूळ रा. चावडी चौक घोडेगाव, ता. आंबेगाव) व ५ अल्पवयीन बालके, यांना २४ तासांच्या आत नारायणगाव, मुंबई, वापी (गुजरात) येथून ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध सुरू असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत

हेही वाचा

राजकारण नव्हे तर देशवासियांची सेवा हा आपला ध्यास ; पंतप्रधान मोदी

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

हनुमान चालीसा मशिदीसमोर म्हणून हिंदू मुस्लिम वाद लावू नका : आठवले

Back to top button