पुणे : लोणी देवकर येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; बसही जळून खाक | पुढारी

पुणे : लोणी देवकर येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; बसही जळून खाक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर (ता. इंदापूर) गावचे तोंडेवस्ती जवळ एका दुचाकी चालकाने चुकीच्या बाजूने येऊन टेंपोला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनोळखी दुचाकी चालक जागीच ठार झाला. मात्र दुचाकी एका चालत्या बसखाली अडकल्याने बसला आग लागली. यात ती बस जळून खाक झाली. हा अपघात गुरूवारी (दि.१२ ) पहाटेच्या सुमारास घडला आहे.

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, १५ मे रोजी पदभार स्वीकारणार

या अपघातात टेंपोला धडकलेली दुचाकी रस्तावर पडल्यानंतर पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या खासगी प्रवासी बस खाली अडकली आणि काही अंतर फरफटत गेली. या प्रकारात बसने पेट घेतला आणि बघता बघता बस जळून खाक झाली. बसचालकाने वेळीच प्रसंगावध राखत बस थांबवल्याने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच : शरद पवारांचे सूचक विधान, पुन्‍हा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे लोणी देवकर गावचे हद्दीत तोंडेवस्ती जवळ टेंपोचा (एम. एच.-14-जे.डी.-8514) चालक अनिल पाटील पुण्याहून सोलापूरकडे निघाला होता. त्याचवेळी चुकीच्या दिशेने येणारी दुचाकी समोरून येऊन त्याच्या टेंपोस धडकली. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. ही धडक एवढी जोराची होती की यात टेंपोचा स्टेअरिंग राॅड तुटला आणि रस्त्यावर पडलेली मोटारसायकल (एम. एच.-11-सी. एच.-6676 ) या लक्झरी बसखाली गुंतली गेली. बसने ती मोटार सायकल काही अंतरापर्यंत फरफरपटत नेली. याच दरम्यान मोटारसायकल ने पेट घेतल्याने बस चालकाने प्रसंगावधान दाखवित तात्काळ बस थाबवून त्यामधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. त्यानंतर आगीत बस संपूर्णता जळून खाक झाली. अग्निशामक यंत्रणेला बोलावून बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली.

औरंगाबाद : लेबर कॉलनी अखेर भुईसपाट, १२ तासांत ३०० घरे जमीनदोस्त

अपघाताची माहिती मिळताचं महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड,सहा.पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब मोहिते,पो. हवालदार उमेश लोणकर,भनुदास जगदाळे यांसह इंदापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

Back to top button