जबरी चोरी, घरफोड्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान! | पुढारी

जबरी चोरी, घरफोड्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून शहरात जबरी चोरी व घरफोडींच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसते आहे. काबाडकष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटे काढून जमा केलेली पुंजी व किमती ऐवज चोरटे लंपास करत आहेत. बंद घरावर डल्ला मारणार्‍या टोळ्या सुसाट असतानाच लूटमार करणारे दुचाकीस्वार चोरटेदेखील मागे नाहीत. चार दिवसांपूर्वी शहरातील विविध भागात जबरी चोरीचे तब्बल दहा प्रकार घडले होते. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. घरफोडी होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या विरोधातील ब्रिजभूषण सिंहांच्या सभेला मोठा प्रतिसाद

उन्हाळी सुटीत मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जाणार असाल तर योग्य खबरदारी घ्या. कारण शहरात दररोज घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटीला जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहरात दररोज एक-दोन घरफोडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामध्ये दररोज लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. उन्हाळा व शाळांना सुट्या असल्यामुळे काही जण आपल्या मूळ गावी तसेच पर्यटनासाठी जातात. याच संधीचा फायदा घरफोडी करणाचे चोरटे घेतात. बंद फ्लॅट फोडून नागरिकांचे घर साफ केले जाते. त्यामुळे आपल्या फ्लॅट, घरात घरफोडी होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय

सीसीटीव्ही बसवणे गरजेचे

शहरात घरफोडी करणारे चोरटे सक्रिय आहेत. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही नसलेल्या सोसायट्या हेरून चोरटे घरफोड्या करत असल्याचे दिसून आले आहे. रात्रीबरोबरच दिवसादेखील घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोसायट्यांना सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, पोलिसांनीदेखील या काळात शहरातील गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच असे गुन्हे करणार्‍यांची झाडाझडती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे घरफोडीचे गुन्हे कमी होतील तसेच जबरी चोरीदेखील रोखता येतील.

ओबीसी राजकीय आरक्षण : मध्‍य प्रदेशमधील पंचायत निवडणुकांची अधिसूचना दोन आठवड्यात काढा : सर्वोच्‍च न्‍यायालय

चालू वर्षातील 9 मे अखेरपर्यंत शहरातील विविध भागांत 191 गुन्हे दाखल झाले आहेत. गतवर्षी याच काळात 134 घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यामुळे यंदा घरफोडीच्या घटनेत वाढ झाली आहे. सर्वाधिक घरफोडीचे गुन्हे झोन पाचमधील हडपसर, लोणी काळभोर, कोंढवा, वानवडी, मुंढवा या पोलिस ठाण्याचा हद्दीत घडले आहेत. या ठिकाणी 67 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानंतर झोन चारमध्ये 45 घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. तसेच जबरी चोरीचे तब्बल 119 गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये 43 मोबाईल हिसकावण्याच्या घटना आहेत. गेल्यावर्षी या दोन्ही गुन्ह्यांचे प्रमाण या कालावधीत 70 च्या घरात होते.

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब; संतप्‍त जमावाने १२ मंत्र्यांची घरे दिली पेटवून, भारतीयांसाठी हेल्‍पलाईन जारी

चोरटे पोलिसांना सापडेनात

सव्वा महिन्याचा कालावधी लोटला तरी वारजेतील गणपती माथा येथील सराफाच्या दुकानातून 1 कोटी 23 लाखांचे दागिने चोरणारे चोरटे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत, तर पंधरा दिवसांनंतरदेखील सोमवार पेठेतील एका मोबाईल शॉपीतून 307 मोबाईल चोरणारे चोरटे फरारच आहेत. चोरीच्या या दोन्ही घटना मोठ्या आहेत. भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी या चोर्‍या केल्या आहेत.

Pandit Shivkumar Sharma : ज्‍येष्‍ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

अशी घ्या खबरदारी

  • बाहेर जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
  • बाहेरगावी जाताना शेजार्‍यांना कल्पना द्या.
  • सोसायटीमधील अनेक व्यक्ती बाहेरगावी जाणार असतील, तर पोलिसांना त्याची कल्पना द्या.
  • सोसायटीमध्ये पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केलेल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करा.
  • सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
  • घरासमोर पेपर पडू देऊ नका. त्याद्वारे चोरट्यांना फ्लॅट बरेच दिवस बंद असल्याचे समजते.
  • सोने, रोकड, दागिने घरात ठेवू नयेत, ते सुरक्षितरीत्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.
  • घराबाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावू नये. त्याऐवजी लॅच लॉकचा वापर करावा. (यामुळे चोराला घरात कोणी आहे किंवा नाही याचा अंदाज घेता येत नाही)
  • बाहेर पर्यटनाला गेल्यानंतर शक्यतो तेथील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे टाळा, कारण चोरटे त्यावरूनदेखील घरात कोणी नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरी करतात.

Back to top button