पिंपरी : घरमालकाच्या मुलीचा विनयभंग | पुढारी

पिंपरी : घरमालकाच्या मुलीचा विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भाडे कराराची प्रत घेण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या भाडेकरू तरूणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही

ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी भोसरी येथे घडली. उस्मान गुलाम खान (21, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमएस धोनीचे T20 मध्ये अनोखे ‘द्विशतक’!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची 15 वर्षीय मुलगी घरी एकटीच होती.

मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच खात्‍यातील साडेअकरा लाख रुपयांवर डल्ला !

दरम्यान, आरोपी भाडे कराराची प्रत घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने घरमालकाच्या घरात मुलगी एकटी असल्याचे पाहिले आणि तिच्यासोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

Back to top button