MS Dhoni T20 Record : धोनीचे T20 मध्ये अनोखे ‘द्विशतक’! | पुढारी

MS Dhoni T20 Record : धोनीचे T20 मध्ये अनोखे ‘द्विशतक’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वात आणखी एक मोठा विक्रम केला आहे. यावेळी त्याने दिग्गज यष्टीरक्षकांना मागे टाकले आहे. त्याच्या जवळपासही कुणी इतर यष्टीरक्षक नाही. वास्तविक, टी-20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून 200 झेल घेणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. (MS Dhoni T20 Record)

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने रविवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात हा झेल विक्रम केला. (MS Dhoni T20 Record)

धोनीने 347 टी-20 सामन्यात 200 झेल घेतले

दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यात धोनीने दोन झेल घेतले. यामध्ये त्याने प्रथम रोव्हमन पॉवेलला शिकार बनवले. यानंतर त्याने शार्दुल ठाकूरचा दुसरा झेल घेतला. यासह त्याने यष्टिरक्षक म्हणून टी-20 फॉर्मेटमध्ये झेल घेण्याचे द्विशतक पूर्ण केले. (MS Dhoni T20 Record)

आत्तापर्यंत धोनीने यष्टिरक्षक म्हणून एकूण 347 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 200 झेल घेतले आहेत. धोनी हे सर्व सामने टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खेळला. (MS Dhoni T20 Record)

माहीनंतर दिनेश कार्तिकचा नंबर

347 टी-20 सामन्यांमध्ये धोनीने एकूण 284 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने 84 स्टंपिंग केले आहेत. या विक्रमाच्या बाबतीत धोनीच्या जवळपासही कोणी नाही. त्याच्यानंतर भारताचा दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने यष्टिरक्षक म्हणून आतापर्यंत 299 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 182 झेल घेतले आहेत. कार्तिकने 61 स्टंपिंगसह एकूण 243 विकेट घेतल्या. (MS Dhoni T20 Record)

विकेटकीपर : देश : टी 20 : झेल

महेंद्र सिंह धोनी : भारत : 347 : 200
दिनेश कार्तिक : भारत : 299 : 182
कामरान अकमल : पाकिस्तान : 282 : 172
क्विंटन डिकॉक : साउथ अफ्रीका : 226 : 166
दिनेश रामदीन : वेस्टइंडीज : 229 : 150

Back to top button