Sandeep Deshpande : फरार संदीप देशपांडेंच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेची धावाधाव | पुढारी

Sandeep Deshpande : फरार संदीप देशपांडेंच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेची धावाधाव

मुंबई : पुढारी ऑनलाईन : बेदरकार गाडी चालवून महिला पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, मागील तीन दिवसांपासून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी फरार असून त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेने धावाधाव सुरू केली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी देशपांडे आणि धुरी यांचा ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे. उरण, कर्जत, मुंबई येथे त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Jitendra Awhad : ‘गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा!’

मशिदीवरील भोंगा आंदोलन सुरु होण्याआधी दररोज वल्गना केलेल्या, पण ४ मे रोजी प्रत्यक्षात पोलीस समोर दिसताच हातातून सुटून फरार झालेल्या मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)  यांच्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेदरकार गाडी चालवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर पोहोचले होते. त्यावेळी देशपांडे पोलिसांच्या हातातून गाडीत बसून सुसाट वेगात फरार झाले होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून जखमी झाली होती.

पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असताना मनसेने त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव सुरू केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button