दापोडी : कासारवाडीतील जलतरण तलाव सुरू | पुढारी

दापोडी : कासारवाडीतील जलतरण तलाव सुरू

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात गुरुवारी शौकिनांची पोहण्यासाठी गर्दी
झाली होती.

अमरावती : शेतीच्या वाटणीवरून डोक्यात दगड घालून सावत्र आईचा खून

अनेक महिन्यांपासून बंद असलेला जलतरण तलाव गुरुवारपासून सुरू झाला आहे. त्यामुळे परिसरातील शौकिनांनी पोहण्यास गर्दी केली होती. दिवसभरामध्ये दुपारी महिलांची बॅच झाल्यानंतर, दोन-तीन बॅच मुलांच्या होतात. या वेळी तिकीट विक्री घराजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

सांगली : महाविकास आघाडी हे बहुजनांचे सरकार हा फसवा दावा; गोपीचंद पडळकर

तिकीट घेण्यासाठी काही टवाळखोर मुले तिकीट घरापाशी टवाळखोरी करत असल्याचे चित्र दिसून आले.तलाव सुरळीत सुरू झाल्यामुळे परिसरातील शौकीनांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही तरुणांनी तलाव सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केला.

Back to top button