पिंपरी : 22 हजार 244 वीज ग्राहकांनी दिली ‘गो ग्रीन’ला पसंती | पुढारी

पिंपरी : 22 हजार 244 वीज ग्राहकांनी दिली ‘गो ग्रीन’ला पसंती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महावितरणतर्फे ‘गो-ग्रीन’ योजना ही राबविली जात असून या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ग्राहकांपैकी 22 हजार 244 ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे.

‘सहकारी चळवळीचे वाटोळे आणि श्राद्ध घालण्याचे काम शरद पवार यांनी केले’

ग्राहकांनी कागद विरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे.

प. बंगाल : अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याची हत्या

महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेच ‘ई-मेल’, ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहेत.

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित

त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाइनद्वारे तात्काळ भरण्याची पिंपरी चिंचवडकरांचा सहभाग
वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Back to top button