Arya Taware : बारामतीच्या आर्याने पटकावले ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान

Arya Taware : बारामतीच्या आर्याने पटकावले ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान

Published on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मूळच्या बारामतीकर असलेल्या आर्या कल्याण तावरे (Arya Taware) हिने जगभरात नावाजलेल्या फोर्ब्ज या मासिकात स्थान मिळविले आहे. युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षाखालील ३० प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. त्यात आर्याला स्थान मिळाले आहे.

लंडन युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडल्यावर आर्या कल्याण तावरे (Arya Taware) हिने वयाच्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा व्यवसाय होता. याशिवाय या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही या स्टार्टअपने भूमिका बजावली. या कंपनीचे नाव फ्युचरब्रीक्स असे आहे. या कंपनीची आजचे बाजारमूल्य ३२.७ कोटी पौंड इतके असून ते आज २२ वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहे. आर्याचे कुटुंब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news