पुणे : शंकर महाराज उड्डाण पुलावर एसटीचा भीषण अपघात; ७ ते ८ गाड्यांना उडवले, वाहतुकीची कोंडी | पुढारी

पुणे : शंकर महाराज उड्डाण पुलावर एसटीचा भीषण अपघात; ७ ते ८ गाड्यांना उडवले, वाहतुकीची कोंडी

पुणे; पुढारी वृत्‍तसेवा : पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर आज एसटीचा भीषण अपघात झाला. एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने तीन ते चार दुचाकीस्‍वारांना एसटीने उडवले. तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्‍याचे दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून आज शंकर महाराज उड्डाणपुलावर अपघात घडला. यामध्ये एसटी बसने अनेक वाहनांना उडवले. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही अनेकजण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारांसाठी तात्‍काळ ससून रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले असून, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे.

 

Back to top button