आता प्रवाशांच्या सोबतीला ‘डेक्कन क्वीन’मध्ये बिरबल! | पुढारी

आता प्रवाशांच्या सोबतीला ‘डेक्कन क्वीन’मध्ये बिरबल!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘डेक्कन क्वीन’ने पुणे-मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोबतीला आता चक्क बिरबल दाखल झाला आहे. प्रवाशांना पुणे, मुंबई या शहरांसह मार्गावरील विविध ठिकाणांसह आवश्यक माहिती बिरबलच्या मदतीने एका क्लिकवर मिळणार आहे.

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

मध्य रेल्वे प्रशासनाने ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’अंतर्गत ‘गपशप’ या कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीकडून ‘ट्रॅव्हल विथ बिरबल’ ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक समृद्ध आणि आकर्षक बनण्यास मदत होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. ‘डेक्कन क्वीन’सह पुणे मार्गावरील इंद्रायणी एक्स्प्रेस आणि कोनार्क एक्स्प्रेसमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू

मुंबई : उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर करणार हनुमान चालीस पठण, राणा दाम्पत्यांचे आव्हान

नवाब मलिकांना आणखी एक दणका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Back to top button