पुणे : पूर्ववैमनस्यातून देशी दारू दुकानातील मॅनेजरचा खून | पुढारी

पुणे : पूर्ववैमनस्यातून देशी दारू दुकानातील मॅनेजरचा खून

पुणे, धायरी : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून देशी दारूच्या दुकानात काम करणार्‍या मॅनेजरचा एकाने सिमेंटच्या विटेने मारहाण करून खून केला. दिनकर सुर्यभान कोटमाळे (वय ४०, रा. चरवड वस्ती, वडगाव पठार) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तौशिब रफिक शेख (वय २४, रा. आनंदनगर, वडगाव बुद्रुक) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही घटना शनिवारी (दि. १६) दुपारी  वडगाव बुद्रुक सिंहगड रोड शरद हॉस्पिटलच्या मागे प्रयेजा सिटी रोडवर असलेल्या रामदास काशिनाथ घुले व अरुण काशीनाथ घुले यांच्या देशी दारुच्या दुकानात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली व्यक्ती कोटमाळे हे दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करत होते.  आरोपी तौशिब शेख हा दारु पिण्यासाठी दुकानात नेहमी येत असे. दोन दिवसापूर्वी देखील कोटमाळे व तौशिब या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तौशिब दारू पिण्यासाठी दुकानात आला होता. दोघांत दारुच्या कारणातून पुन्‍हा वाद झाला.  तौशिब याने कोटमाळे यांच्या डोक्यात सिमेंटच्या विटेने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने कोटमाळी यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button