अल्पवयीन मुलीच्या स्तनांना हात लावणे हा लैंगिक अत्याचारच : कोलकाता हायकोर्ट | पुढारी

अल्पवयीन मुलीच्या स्तनांना हात लावणे हा लैंगिक अत्याचारच : कोलकाता हायकोर्ट

कोलकाता, पुढारी ऑनलाईन : कोलकाता उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. अल्पवयीन पीडितेचे स्तन विकसित झालेले नसतानाही तिला चुकीच्या हेतूने स्पर्श करणे हा लैंगिक गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात हायकोर्टाने आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम 7 अंतर्गत दोषी ठरवले. हा निर्णय 2017 च्या एका खटल्याच्या संदर्भात देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण…

13 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या घरी कोणी नसताना आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, तिच्या चेहऱ्यावर चुंबन घेतले, असा आरोप करण्यात आला होता. खटल्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याने मुलीचे स्तन विकसित झालेले नसल्याचा जबाब दिल्याने पीडितेच्या स्तनांना स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आरोपीने कारवाईदरम्यान सांगितले.

दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी याच मुद्द्यावरून युक्तिवाद केला. आरोपिचे वकील म्हणाले की, पीडितेच्या स्तनांना स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या प्रकरणातील वैद्यकीय अधिकाऱ्याने मुलीचे स्तन विकसित झालेले नसल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटले होते. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. न्यायमुर्ती विवेक चौधरी म्हणाले की, 13 वर्षांच्या मुलीचे स्तन विकसित झाले की नाही हे महत्त्वाचे नाही. मुलीच्या शरीराच्या त्या विशिष्ट भागाला स्तन म्हटले जाईल, जरी तिचे स्तन वैद्यकीय कारणांमुळे विकसित झाले नाहीत.’

न्यायमूर्ती विवेक चौधरी यांनी निरीक्षण नोंदवले की, “तेरा वर्षांच्या मुलीचे स्तन विकसित झाले आहेत की नाही हे पूर्णपणे महत्त्वाचे नाही. 13 वर्षांच्या मुलीच्या शरीराच्या विशिष्ट भागाला स्तन म्हटले जाईल… जरी काही कारणांमुळे वैद्यकीय कारणांमुळे तिचे स्तन विकसित झाले नसले तरी. POCSO कायद्याच्या कलम 7 नुसार कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीच्या लिंग, योनी, गुदद्वार किंवा स्तनांना स्पर्श करणे किंवा लैंगिक हेतूने स्पर्श करणे हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे.’

घरात कोणी नसताना आरोपीने चुंबन घेतले..

एका 13 वर्षांच्या मुलीचे चुंबन घेण्यामागचा हेतू काय असू शकतो, असे विचारले असता न्यायालयाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात पीडित मुलीने म्हटले आहे की, आरोपीने तिच्या शरीराच्या विविध भागांना स्पर्श केला आणि तिचे चुंबन घेतले. पीडित मुलीशी संबंधित नसलेल्या वृद्ध व्यक्तीने तिचे पालक उपस्थित नसताना तिचे चुंबन घेण्यासाठी तिच्या घरी का जावे? आरोपीच्या विशिष्ट संपर्कांवरून आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरून एखाद्या व्यक्तीचा लैंगिक हेतू जाणून घेता येतो, असेही न्यायालयाने म्हटले.

लैंगिक हेतूचा कोणताही थेट पुरावा असू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. सध्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या घरात ती आणि तिच्या पतीच्या अनुपस्थितीत घुसून पीडित मुलीच्या अंगाला स्पर्श करून तिचे चुंबन घेणे यावरून आरोपीचा लैंगिक हेतू असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे.

Back to top button