पिंपरी गावात साकारतेय छत्रपती संभाजी महाराज सृष्टी | पुढारी

पिंपरी गावात साकारतेय छत्रपती संभाजी महाराज सृष्टी

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पिंपरी गावातील वाघेरे कॉलनीमधील जोग महाराज उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिल्प साकारण्यात येत आहेत. त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान शहराच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

जोग महाराज उद्यानाचे दगडी बांधकाम झाडे वाढल्याने खराब झाले आहे असे सांगत तत्कालीन नगरसेवकांनी या उद्यानाची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली.

त्यानुसार नवीन बांधकाम आरसीसीमध्ये करण्याचा निर्णय घेतला गेला. या उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 18 शिल्प उभारावीत अशी कल्पना मांडण्यात आली. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी ती उचलून धरली.

महाराष्‍ट्रासह चार राज्‍यांतील पोटनिवडणुकीत भाजपला धक्‍का

उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिनांक 25 डिसेंबर 2016 साली झाले. पावणेचार कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे दोन भाग करण्यात आले.

काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले; मात्र ते पूर्ण झालेच नाही. त्यानंतर डिसेंबर 2018 ची डेडलाईन ठरविण्यात आली.

त्यातच स्थानिक नागरिक पराग नाणेकर यांनी उद्यानाच्या पश्चिमेकडील जागेवर दावा सांगत कामास विरोध केल्याने उद्यानाचे व पर्यायाने छत्रपती संभाजी महाराज सृष्टीचे काम रेंगाळले.

‘हिमालया’वरून विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मी काय करायचे ते माझे श्रेष्ठी ठरवतील’

जागेचा वाद, डिमार्केशनचा प्रश्न मिटला. तोच कोरोना, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता यामुळे काम रेंगाळले; आता मात्र उद्यानाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अठरा शिल्प बसविण्याचे नियोजन असून त्यापैकी 12 शिल्प तयार आहेत. किरकोळ कामे बाकी असून महिनाभरात हे काम पूर्ण होईल असे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.

कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, आता हिमालयात कोण जातं ते पाहूच : संजय राऊत

उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे प्रवेशद्वार, सीमा भिंत, पाथ वे, लॉन आदी कामे पूर्ण झाली आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंग साकारणार्‍या शिल्पांचे संकल्पचित्र मूर्तिकार योगेश कुंभार यांनी तयार केले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. ती महिनाभरात ती पूर्ण होतील.
-सुनील वाघुंडे, कार्यकारी अभियंता ,उद्यान विभाग

Back to top button