Pune News : रेल्वेला स्क्रॅपमधून 16 कोटींचे उत्पन्न; पुणे विभागात झिरो स्क्रॅप मिशनला गती

Pune News : रेल्वेला स्क्रॅपमधून 16 कोटींचे उत्पन्न; पुणे विभागात झिरो स्क्रॅप मिशनला गती

Published on

पिंपरी(पुणे) : झिरो स्क्रॅप मिशनअंतर्गत रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड यामधील भंगार साहित्याची वेळेत विक्री करणे आवश्यक आहे. त्यानुसार, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत पुणे विभागातील गोळा केलेल्या स्क्रॅपमधून 16 कोटी 8 लाखांचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे. रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीद्वारे आर्थिक भर पडते. त्यासोबतच रेल्वेच्या भंगार साहित्याच्या विक्रीमधूनदेखील रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या भंगार साहित्याची विक्री

कालबाह्य लोको, डिझेल सरप्लस लोको, जुने रेल्वे रूळ, अपघाती लोको कोच, डिझेल इंजिन, तांबे आणि बॅटरी आदी भंगार साहित्याची विक्री होते.

या ठिकाणी होते विक्री

1) घोरपडी – येथील कोचिंग कॉम्प्लेक्स आणि डिझल शेड.
2) बेगडेवाडी – डिझल शेड
3) कोल्हापूर ः डिझल शेड

या भंगार साहित्याचा पुनर्वापर

रेल्वेच्या भंगारात निघालेल्या साहित्यामधील व्हील आणि एक्सल यांचा पुनर्वापर करून, त्यापासून पुन्हा व्हील आणि एक्सल बनविण्यात येतात.

वाहतूक खर्च टाळला जातो

वजनाने अधिक असल्याने वाहतुकीचा खर्च टाळावा म्हणून हे भंगार साहित्य आहे त्याच जागेवर विक्री केली जाते. किंवा घोरपडी आणि बेगडेवाडी येथील शेडमध्ये विक्री केली जाते.

रेलव्हील कंपनीत चाके आणि अ‍ॅक्सलवर प्रक्रिया

बंगळूरमधील येलाहंका शहरात असलेल्या रेलव्हील कंपनीमध्ये भंगारात निघालेली चाके आणि अ‍ॅक्सल वितळविले जाऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्याचा पुनर्वापर करून, पुन्हा चाके आणि अ‍ॅक्सल बनवितात.

ऑनलाईनद्वारे बोली

ऑनलाईन www.ireps.gov.in या साईटवर भंगार साहित्याची माहिती अपलोड केली जाते. यानंतर दिलेल्या तारखेमध्ये ऑनलाईनद्वारे बोली लावली जाते. त्यानुसार, साहित्याची विक्री होते.
काय आहे,

झिरो स्क्रॅप मिशन

रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा आणि शेडमधील वापराविना पडून असलेले भंगार साहित्य हे वेळेवर विक्रीसाठी काढून, परिसर भंगारमुक्त करण्यात यावा. हा झिरो स्क्रॅप मिशनचा उद्देश आहे.

झिरो स्क्रॅप मिशनअंतर्गत रेल्वेच्या सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त असल्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहिली आहे. या भंगार साहित्याच्या विक्रीमधून रेल्वेच्या तिजोरीत आणखी भर पडली आहे.

– अ‍ॅड. रामदास भिसे,
जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news