अन् तो बिबट्या पुन्हा गुरगुरू लागला!

अन् तो बिबट्या पुन्हा गुरगुरू लागला!
Published on
Updated on

सोनकच्छ : देवासमधील इकलेरा गावात दोन-तीन आठवड्यांपूर्वी एका प्रशस्त नदीच्या किनारी एका बिबट्याला तेथील स्थानिक नागरिकांनी जणू घरातील पाळीव प्राणी असल्याप्रमाणे त्याची मिरवणूक काढली होती. कोणीही यावे, त्यावरून हात फिरवावा आणि आपल्याला हव्या त्या दिशेने त्या बिबट्याला फिरवावे, त्याच्या सोबत सेल्फी घ्यावी, हा शिरस्ता एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.

'गजनी' चित्रपटातील एक पात्राला आजारी असताना स्मृतिभ-ंश झाला होता, असे दाखवले गेले होते. तशीच स्थिती या बिबट्याची झाली होती. पण, आता हा बिबट्या ठीकठाक झाला असून तो पूर्वीप्रमाणे गुरगुरूदेखील लागला आहे. यापूर्वी व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याची तब्येत बिघडली होती आणि इंदोर प्राणीसंग्रहालयातील उपचार लागू होत नसल्याने त्याला सोनकच्छला पाठवण्यात आले.

तेथे मात्र उपचाराची मात्रा लागू झाली. हळूहळू त्याला पूर्वीसारखा मजबूत आहार देण्यात येऊ लागला. नंतर त्याला गुरुवारी 1 किलो तर शुक्रवारी 2 किलो चिकन देण्यात आले. यामुळे हा बिबट्या आधीप्रमाणेच आता आक्रमक झाला आहे आणि त्याला सलाईन लावण्यासाठी 10 जण असूनही आवरता येत नाही, अशी आताची परिस्थिती झाली आहे. या बिबट्यासाठी आता 8 फूट लांब व 5 फूट रुंद पिंजरा तयार करण्यात आला असून पुढील काही दिवस त्याचे वास्तव्य याच पिंजर्‍यात असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news