पुणे : जमीन व्यवहारात १ कोटी ५२ लाखांची फसवणूक, पाच जणांविराेधात गुन्‍हा दाखल | पुढारी

पुणे : जमीन व्यवहारात १ कोटी ५२ लाखांची फसवणूक, पाच जणांविराेधात गुन्‍हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जमीन खरेदी खतावेळी दिलेले चेक बाऊन्स करत मूळ जमीन मालकाची १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सुभाष रामचंद्र धुमाळ (रा. साई कॉम्प्लेक्स, तपकीर गल्ली, फडके हौदजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली. शिवतेज डेव्हलपर्स तर्फे भागीदार राहुल शिवाजी तारू (रा. बारामती ) , अनिल बबन कदम (रा. अनभूलेवाडी, ता. माण, जि. सातारा), विराट वसंत तावरे (रा. सांगवी, ता. बारामती), सागर बाळू शिंदे (रा. लोणंद) आणि सुनील अनंता पवार (रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी सुभाष धुमाळ यांची बारामती शहरात सर्व्हे क्रमांक १२८ मध्ये क्षेत्र आहे. त्यातील ०.५८ आर जमिनाचा व्यवहार १ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांना ठरला. संशयितांनी त्यांना २७ लाख ५० हजारांची रक्कम दिली. त्यांनी दिलेले प्रत्येकी ७६ लाख १५ हजार रुपयांचे दोन चेक वटले नाहीत. या रकमेच्या चेकची नोंद खरेदी दस्तात करण्यात आली होती. ही रक्कम न देताच या क्षेत्रावर प्लॉटींग करत त्याची विक्री सुरु करण्यात आली. यासंबंधी फिर्यादीने वारंवार त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु त्यांनी मालकी हक्काची नोंद करून राहिलेले पैसे देतो, असे सांगत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button