पिंपरी : अश्लील संदेश, फोटो पाठवून विनयभंग | पुढारी

पिंपरी : अश्लील संदेश, फोटो पाठवून विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शेअर चॅटवर एका महिलेला अश्लील फोटोचे मेसेज महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सहा मोबाइल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 11 फेब्रुवारी ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत सांगवी येथे ऑनलाइन घडली. याबाबत पीडितेने गुरुवारी (दि. 7) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सहा मोबाइल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शरद पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित षड्यंत्र : जयंत पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे सोशल मिडीया अ‍ॅपवर अकाऊंट आहे. दरम्यान, त्या अ‍ॅपवर चॅटींग करताना तिची इतरांशी ओळख झाली.

फिर्यादी यांचा मोबाइल क्रमांक सर्वांशी शेअर झाला. त्यानंतर त्या महिलेला आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून अश्लील मेसेज व फोटो पाठविले; तसेच, त्या महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून आरोपींनी तिचा विनयभंग केला.

जान्हवीचा बॅकलेस जंपसूट, बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले (Video)

याबाबत महिलेने संबंधित व्यक्तीला या कृत्याबाबत फोन करून विचारणा केली असता त्या व्यक्तीने पीडित महिलेला धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

Back to top button