राजगुरूनगर : प्यायला मागितले पाणी आणि पळविले सोने

राजगुरूनगर : प्यायला मागितले पाणी आणि पळविले सोने

Published on

राजगुरूनगर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा : प्यायला पाणी मागितल्यावर तहानलेल्या व्यक्तीला सहज पाणी द्यायची मानसिकता असते. संतांनी काशीला चालवलेले पाणी गाढवाला पाजल्याचा दाखला ग्रंथ परंपरेने मागे ठेवला आहे. मात्र ही भूतदया पिंपरी बुद्रुक (ता खेड) येथे लादवड वस्तीवर राहत असलेल्या एका भोळ्याभाबड्या गुंबाई भुजबळ या आजीला चांगलेच महागात पडले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी (दि ६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने प्यायला पाणी मागितले. आजीने पाणी बाहेर आणुन दिले. पण याने आजीला एकटीला पाहुन गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडले आणि तेथून पळ काढला. यानंतर आजीने आरडाओरडा केला, कुटुंबातील व शेजारी तेथे आले. पण तोपर्यंत चोरटा गेला होता.
तसेच, पिंपरीची गुरुवारी (दि ७) यात्रा आहे. बैलगाडा शर्यती आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे घाट व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्‍यामधील हे कृत्‍य केले असल्‍याचे सरपंच मच्छिंद्र भुजबळ यांनी सांगितले. मुलगा दगडू पांडुरंग भुजबळ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरूदध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news