पुणे : पुढारी वृत्तसेवा
प्रसाधनगृहात मोबाईल ठेवून विद्यार्थ्याने घरी शिकवणी घेण्यासाठी येणार्या शिक्षिकेचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 ते 30 मार्च 2020 या कालावधीत कर्वेनगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पौड रोड येथील 56 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार अलंकार पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या मिाहतीनुसार, फिर्यादी शिक्षिका गेले पाच वर्ष इंग्रजी विषयाच्या शिकवणीसाठी मुलाच्या घरी जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या घरातील प्रसाधनगृहात गेल्या होत्या. मुलाने प्रसाधनगृहात मोबाइल लपवून ठेवला होता. शिक्षिका प्रसाधनगृहात जाण्यापूर्वी मुलाने मोबाइलमधील व्हीडीओ चित्रीकरण सुरू केले होते.
हा प्रकार शिक्षिकेच्या निदर्शनास आला. यापूर्वीही मुलाने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मुला विरोधात अलंकार पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा, विनयभंग या कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्हे निरीक्षक संगीता पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा