पुणे : धानोरी येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई | पुढारी

पुणे : धानोरी येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान विरोध करत अधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर आज (बुधवार) पुन्हा सकाळपासून धानोरी येथे महापालिकेच्या संपूर्ण फौज फाट्यासह अतिक्रमण  (Encroachment action) कारवाई करण्यात येत आहे.

(Encroachment action) १० जेसीबी, २५ ट्रक आणि १५ क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण विभागाचे निरीक्षक, कर्मचारी यासह अतिक्रमण विभाग प्रमुख उपायुक्त माधव देशपांडे, उपायुक्त संजय गावडे, वैभव कडलख, सुहास जगताप, डी. एस. ढोकळे, या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौज फाटा सहभागी झाला होता. लक्ष्मीनगर सोसायटीजवळून कारवाईला सुरवात झाली. धानोरी जकात नाकापर्यंत दुपारपर्यंत कारवाई  सुरु होती.

Encroachment action : नगरसेविकेच्या पतीचा फूड झोनवर कारवाई

धानोरी येथे नगरसेविकेच्या पतीने उभारलेल्या फूड झोनवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे पंधरा पत्रा शेडमध्ये बांधलेली दुकाने आतमधील साहित्यासह पाडण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button