इझाबेल : तर कॅटरिनाच्या बहिणीच्या नावावर ‘आरआरआर’ची नोंद झाली असती

इझाबेल : तर कॅटरिनाच्या बहिणीच्या नावावर ‘आरआरआर’ची नोंद झाली असती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

नशिबात असल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही असे म्हटले जाते. चित्रपटसृष्टीत तर याचा नेहमीच अनुभव येत असतो. इतरांनी नाकारलेले चित्रपट स्वीकारून शाहरूख खानने पदार्पणानंतर दमदार सुरुवात केली होती. काहींनी नाकारलेल्या भूमिका पडद्यावर काही कलाकारांनी अजरामरही करून ठेवलेल्या आहेत. सध्या एस.एस. राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाची ऑफर कॅटरिना कैफची बहीण इझाबेल कैफ हिलाही देण्यात आली होती. ज्युनिअर एनटीआरच्या प्रेयसीची ही भूमिका होती; पण इझाबेलने ही भूमिका करण्यास नकार दिला होता! त्यानंतर ऑलिव्हियाने ही भूमिका चित्रपटात साकारली. एका रिपोर्टनुसार इझाबेलने चित्रपटाची स्क्रिप्ट आणि सर्व तपशील मागितला होता; पण तो दिला गेला नसल्याने तिने भूमिका नाकारली.

इझाबेलने 2021 मध्ये 'टाईम टू डान्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटाला यश मिळाले नाही. आता तिने जर 'आरआरआर' केला असता तर तिच्या नावावर एका सुपरहिट चित्रपटाची नोंद झाली असती!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news