पुणे : महिला आयोगाच्‍या अध्यक्षांनी घेतली चाकू हल्‍ल्‍यातील जखमी मुलीची भेट | पुढारी

पुणे : महिला आयोगाच्‍या अध्यक्षांनी घेतली चाकू हल्‍ल्‍यातील जखमी मुलीची भेट

पुणे : पुढारी वृत्‍तसेवा

वडगावशेरी परिसरात अल्‍पवयीन मुलीवर वार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलीची रूग्णालयात जाऊन भेट घेतली.  आरोपीवर गंभीर स्वरूपाच्‍या कलमांसह गुन्‍हा दाखल करण्यात आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

चाकणकर म्‍हणाल्‍या, पीडित मुलीचे दहावीचे पेपर आहेत. तिला रूग्णालयातूनच परीक्षा देता येईल अशी व्यवस्‍था आम्‍ही करणार आहोत. त्‍यासाठी तिला रायटरची व्यवस्‍था करून देण्यात येणार आहे. मुली व  महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना घडूच नयेत यासाठी बडीकॉप, निर्भया पथक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Ukraine Russia War : खेरसानवर रशियाचा कब्‍जा, तीन देशांचे पंतप्रधान घेणार झेलेंस्‍कींची भेट

शाळेवरही कारवाई इशारा

मुलीच्‍या पालकांनी शाळेबाबत तक्रार नोंदवली आहे. मुलीवर हल्‍ला झाल्यावर मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी तिला रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. मात्र, 20 मिनिटे मुलगी तेथेच होती, त्‍यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तिला वाचविण्याचा प्रयत्‍न केल्‍याचे दिसत नाही. त्‍यामुळे शाळेवर कारवाई करण्याचेही संकेत चाकणकर यांनी दिले आहेत. पोलिसांनाही शाळेबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्‍या असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. सुरक्षा व्यवस्‍था असताना त्‍यांनी देखील तिला वाचविण्याचा प्रयत्‍न केला नाही, हे निंदनीय आहे. यापुढे कोणत्‍याच शाळेत अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्‍न केले जाणार असल्‍याचेही चाकणकर यांनी सांगितले.

प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल ; भाजपच्या गोंधळाने विधानपरिषदेत दिवसभरासाठी कामकाज तहकूब

नाव घेता चित्रा वाघ यांना चाकणकर यांचा टोला

रघुनाथ कुचिक यांच्‍यावर गुन्‍हा दाखल असून, गुन्‍ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबधीत मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला, मुलीचे दोन्‍हीही संपर्क नंबर बंद होते. मी स्वतःहून मुलीची भेट घेणार आहे. अन्यथा ती मला भेटली तरी काही हरकत नाही, असेही चाकणकर म्‍हणाल्‍या. कुचिकांना पाठीशी घातले जातेय असा विरोधक आरोप करतात, पण यात काही तथ्य नाही. विरोधकांचे कामच आरोप करणे आहे. तीन महिन्यांच्‍या कालावधीत मी कोणालाही पाठीशी घातलेले नाही.

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये नवा इतिहास रचणार, विधानसभेला लाभणार पहिल्या महिला सभापती

चार कागद हातात घेऊन पत्रकार परिषदेत फडफड करण्यापेक्षा पुरावे पोलिसांकडे सादर करावे, आम्‍ही त्‍यांच्‍यावर कारवाई करू, असा टोला चाकणकर यांनी नाव न घेता चित्रा वाघ यांना लगावला. विरोधकांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र राबविले आहे. असा आरोपही त्यांनी केला.

काही लोक यांनाच कसे भेटतात…

राज्‍य महिला आयोग, राज्‍याचे गृहमंत्री चांगल्‍या पध्दतीने काम करत आहेत. आम्‍ही पीडित मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न करतो, परंतु त्‍या आम्‍हाला न भेटता त्‍या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाजुच्‍या खुर्चीवर स्‍कार्फ बांधून बसलेल्‍या असतात यावर चाकणकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. कुचिक प्रकरणाचा तपास करून त्‍या संबंधीचा अहवाल राज्‍य महिला आयोगाला सादर करण्याचे आदेशही पोलिसांना दिल्‍याचे चाकणकर यांनी सांगितले.

Back to top button