Summer season : मार्चमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र तापणार | पुढारी

Summer season : मार्चमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र तापणार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मार्च ते मे 2022 या तीन महिन्यांत देशाच्या काही भागांत कडक उन्हाळा राहणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान या भागांत कमाल तापमानात मार्च महिन्यात मोठी वाढ होईल. (Summer season)

यामुळे राज्यातील कोकण किनारपट्टीवर (विशेषत: उत्तर कोकण) कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पूर्ण राज्याचा विचार केला असता मार्च ते मे या कालावधीत उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे या भागात तीव— उन्हाळा जाणवेल. याबरोबरच विदर्भ व मराठवाड्याचा बहुतांश भाग मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान हे सरासरीच्या आसपास राहील.

पश्चिम भारत, मध्य भारताचा काही भाग, वायव्य भारत, उत्तर भारताचा काही भाग तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही भागांत या वर्षी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे हा भागही तापणार आहे.

Summer season : या राज्यांत कडक

राजस्थान, गुजरात, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसामचा काही भाग तसेच आंध— प्रदेशच्या किनारपट्टीवर यंदा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. यामध्ये गुजरातचा काही भाग तसेच राजस्थानच्या काही भागांत उन्हाळा तीव— असणार आहे.

Back to top button