पुणे : 60 टक्के मुलांना मिळाला एक डोस; ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठाही विस्कळीत | पुढारी

पुणे : 60 टक्के मुलांना मिळाला एक डोस; ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठाही विस्कळीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील 15 ते 17 वर्षे वयोगटात उद्दिष्टापैकी आतापर्यंत 60 टक्के किशोरवयीनांना पहिला डोस देण्यात आला आहे.
सर्वांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला व दुसरा डोस देण्यात येत असून, 60 टक्के जणांना पहिला डोस, तर 24 टक्के जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

Russia-Ukraine War : रॉकेटसह क्षेपणास्‍त्र मार्‍याने युक्रेनमध्‍ये हाहाकार, रशियन सैन्‍याने कीव्‍हमधील ६४ किलोमीटर परिसर व्‍यापला

किशोरवयीनांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. किशोरवयीनांना पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस महिनाभरात देण्यात येत असल्याने त्यांचे लसीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणारे लाभार्थी देखील वाढलेले आहेत. पुण्यातील 140 केंद्रांवर या किशोरवयीनांचे लसीकरण वेगाने होत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Satya Nadella : सत्या नडेला यांच्या मुलाची दुर्धर आजाराशी झुंज अपयशी

या महिन्यात ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पुरवठा विस्कळीत

झाल्याने लसीकरणाचा वेग मंदावला. शहरात 12 फेब—ुवारीपर्यंत 94 हजार 915 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. गेल्या 13 दिवसांमध्ये फक्त 7,459 लसींचे डोस देण्यात आले. पुरवठ्यात अनियमितता असल्याने शहरात कोवॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला होता.
त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती.

Third World War : तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, युक्रेन-रशिया चर्चा निष्फळ; अण्वस्त्र हल्ल्याचा पुतीन यांचा प्लॅन

ज्या किशोरवयीनांनी अजूनही लस घेतलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा डोस घ्यावा. पहिला डोस घेतल्यानंतर काही मुलांना कोरोना झाला असल्यास त्यांनी तीन महिन्यांनंतर लसीचा उर्वरित दुसरा डोस घ्यावा.
     – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, मनपा

Back to top button