बालाजीनगर के. के. मार्केट प्रभागात राष्ट्रवादी-भाजपमध्येच लढत

बालाजीनगर के. के. मार्केट प्रभागात राष्ट्रवादी-भाजपमध्येच लढत
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर / बाजीराव गायकवाड

पुणे / धनकवडी : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांतील विद्यमान नगरसेवकांचा आताचा प्रभाग एकत्र येऊन बालाजीनगर – के. के. मार्केट नवीन प्रभाग क्र. 49 अस्तित्वात आला आहे. भाजपचे दोन नगरसेवक, तर राष्ट्रवादीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक या प्रभागात एकत्र असल्याने या दोन पक्षांत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

दोघांकडेही दमदार उमेदवार

आताचा बालाजीनगर-राजीव गांधीनगर प्रभाग क्र. 38 चा 60 टक्के भाग, तर मार्केट यार्ड इंदिरानगर प्रभाग क्र. 36 चा 40 टक्के भाग असा एकत्र येऊन प्रभाग क्र. 49 तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, भाजपचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व राणी भोसले आणि इतरही इच्छुक उमेदवारही आपले भवितव्य अजमावणार आहेत. मातब्बर अनुभवी राष्ट्रवादीचे शिलेदार आणि दमदार भाजपचे उमेदवार असेच या प्रभागातील लढतीचे चित्र असेल.

राष्ट्रवादीकडून माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, गौरव घुले, राजेंद्र बर्गे, मिलिंद पन्हाळकर, तर भाजपकडून नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, राणी भोसले, दिगंबर डवरी, समीर धनकवडे इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून शैलेश उर्फ बंडू नलावडे, संजय अभंग, शिवसेनेकडून सरोज कार्वेकर हेसुद्धा इच्छुक उभे राहण्याची शक्यता आहे. मनसेकडून सचिन काटकर. त्यामुळे तीन विद्यमान आणि आणि सात- आठ इच्छुक त्यामुळे उमेदवारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोण उमेदवारी खेचून आणणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत मनसे व काँग्रेस यांच्याकडून इच्छुक उमेदवारांची कमतरता असल्याचे दिसते.

मध्यमवर्गीय व व्यापाऱ्यांचा प्रभाव

मध्यमवर्गीय नागरिकांची लोकवस्ती तर व्यापारीवर्गाची चलती असणारा हा मतदारसंघ आहे. दाट लोकवस्ती व छोट्या-छोट्या सोसायटी चाळ, बैठी घरे असे या प्रभागाचे भौगोलिक वातावरण आहे. मध्येच मोठा ओढा व प्रत्येक पावसाळ्यात या ओढ्यातून आलेला पूर हा चर्चेचा विषय ठरतो. या प्रभागात कमी क्षेत्रफळांमध्ये दाट लोकसंख्या असलेला परिसर म्हणजे बालाजीनगर परिसर आहे. शिवाय या परिसरात भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यांतील बहुतांश मतदार असल्याने हे मतदार निवडणूक निकालात कल देऊ शकतात.

अशी आहे प्रभागरचना

बालाजीनगर, के. के. मार्केट परिसर, महर्षीनगर, वसंत बाग सोसायटी, लीला चेंबर्स, प्रेमनगर, पूनम हाईट्स, ऐश्वर्या पार्क, जय वर्धन सोसायटी, महर्षीनगर, राजर्षी शाहू सोसायटी, कांचनगंगा सोसायटी, संगम सोसायटी, पद्मावतीनगर, जेधेनगर, बिबवेवाडी पार्ट, शोभा सवेरा, श्री संत एकनाथनगर, श्री शिवशंकर सोसायटी, लोअर इंदिरानगर, पद्मावती, सतनाम विवेकनगर, नवकार रेसिडेन्सी.

  • लोकसंख्या : 58,027
  • अनुसूचित जाती : 4,861
  • अनुसूचित जमाती : 301

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news