पुणे : भोर तालुक्यात घड्याळ्याच्या काट्यानुसार बदलणार वाॅर्ड रचना! | पुढारी

पुणे : भोर तालुक्यात घड्याळ्याच्या काट्यानुसार बदलणार वाॅर्ड रचना!

वैभव धाडवे पाटील

सारोळा : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद गट पुणे महानगरपालिकेत गेल्याने भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या तीन जागा आता चार होणार आहेत. सन २०१२ मध्ये असणाऱ्या जुन्या चार जागा जशाच्या तशा ठेवणार असल्याची चर्चा असली तरी, काही गावांची वॉर्ड रचना मात्र घड्याळ्याच्या काट्यानुसार होणार असल्याचे राजकारणातील जाणकारांचे मत आहे. भोंगवली-संगमनेर गटामधून विविध राजकीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळणार, तर कोण पक्षांतर अथवा कोणावर अपक्ष लढण्याची वेळ येणार, हीच मोठी चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळणार असेल तर अनेक दिग्गज नेते आपला पक्ष सोडणार असल्याचीदेखील चर्चा आहे.

संजय राऊतांनी माझ्याच जोड्याने मला मारावे, किरीट सोमय्या यांचे प्रतिआव्हान

भोंगवली गणात गुणंद, हिंगेवाठार, टापरेवाडी, न्हावी ३२२, न्हावी १५, पेंजळवाडी, भांबवडे, भोंगवली, राजापूर, पांडे, सावरदरे, सारोळा, किकवी, केंजळ, काळेवाडी, वागजवाडी, राऊतवाडी, मोरवाडी, पाचलिंगे, लोहकरेवाडी, धांगवडी, निगडे अशा २२ गावांतील २० हजारांच्या आसपास मतदार आहेत, तर संगमनेर गणात कापुरव्होळ, हरिश्चंद्री, दिवळे, कामथडी, उंबरे, खडकी, कासुर्डी गुमा, तेलवडी, मोहुरी बुद्रुक, मोहरी खुर्द, आळंदेवाडी, आळंदे, इंगवली, माळवडी, संगमनेर, नेऱ्हे, ब्राह्मणघर, हर्णस, लव्हेरी, माझगांव, जोगवडी, गोरड म्हसवली, तळे म्हसवली, वाकांबे अशा २५ गावांतील २१ हजार मतदार आहेत. भोंगवली-संगमनेर या गटात त्यामुळे तब्बल ४१ हजार मतदार असतील.

Bappi Lahiri : बाॅलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन

विविध राजकीय पक्षांत अस्तित्वाची लढाई

तीन गावे हातवे बुद्रुक, हातवे खुर्द आणि ताबांड ही गावे नसरापूर-वेळू गणात जात आहेत, तर नसरापूर-वेळू गणातील कामथडी, उंबरे, खडकी ही गावे भोंगवली-संगमनेर गटात जात आहेत. या गावाची अदलाबदल केली जात असल्याची चर्चा आहे. यामध्ये विनाकारण अनेक दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय मतभेद निर्माण करून सत्तेतून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई निर्माण केली आहे. काही गावांची अदलाबदल करताना घड्याळ्याच्या काट्यानुसार भोंगवली-नसरापूर गटाची आणि गणाची रचना करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा आहे.

Chhatrapati Shahaji Maharaj : महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला!

इच्छुक मतदारांच्या संपर्कात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, जिल्हा नियोजन सामिती सदस्य विक्रम खुटवड, भोर पंचायत समिती सभापती लहुनाना शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निगडे, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, मंदार वीर, कासुर्डीच्या सरपंच सारिका मालुसरे, काँग्रेस पक्षाकडून भोर काँग्रेस अध्यक्ष शैलेश साेनवणे, भोरचे उपसभापती रोहन बाठे, राजगडचे संचालक पोपटराव सुके, युवक कार्याध्यक्ष महेश टापरे, आप्पा चव्हाण, कापुरव्होळचे उपसरपंच पंकज गाडे पाटील, शिवसेनेकडून कामथडीचे उपसरपंच नितीन इंगुळकर, किशोर बारणे, तर भाजपमधून विनोद चौधरी, अशोक पांगारे, राजेंद्र मोरे, अक्षय सोनवणे मतदारांच्या संपर्कात आहेत.

रत्नागिरी हापूसच्या एका पेटीला मिळाला २५ हजार रुपये दर

सर्वच राजकीय पक्ष सतर्क

निवडणूक आयोगाकडून प्रारूप रचनेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय पक्षाकडून चाचपणी सुरू झाली आहे. तसेच ज्या-त्या गटातील इच्छुक असलेल्या उमेदवारांनीदेखील गट व गणातील संभाव्य गावांमध्ये संपर्क वाढविला आहे. निवडणूक आयोगाकडे गट व गण रचना गेल्यानंतर हरकती, त्यांचा निपटारा, गट व गणांची आरक्षण जाहीर होईल, त्यासाठी ते इच्छुक नजर ठेवून आहे.

Back to top button