पुणे : आंबेगाव तालुक्यात दैवतांच्या यात्रा बनताहेत राजकीय आखाडा | पुढारी

पुणे : आंबेगाव तालुक्यात दैवतांच्या यात्रा बनताहेत राजकीय आखाडा

संताेष वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न तालुक्यात असणार का याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सद्य:स्थितीत गावाेगाव हाेणाऱ्या बैलगाडा शर्यतीला निवडणुकीची किनार दिसू लागल्याने दैवतांच्या यात्रा आता राजकीय आखाडा बनवण्याची चिन्हे दिसू लागली.

ईडीची दक्षिण मुंबईत मोठी छापेमारी; दाऊदच्या संबंधित मालमत्ता कराराप्रकरणी कारवाई

तालुक्यात ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गण आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विराेधात शिवसेना असा चुरशीचा सामना रंगला. परंतु, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी, शिवसेनेला एक जागा, तर पंचायत समितीच्या दहा जागांपैकी सहा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तीन आणि एक अपक्ष निवडून आले. भाजपनेही ठिकठिकाणी उमेदवार उभे केले हाेते. परंतु, त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते.
मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्‍यासह सोलापूरचे ४ जण ठार

Adhalrao - valse patil

आघाडीचा निर्णय गुलदस्त्यात; इच्छुकांची पंचाईत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील राजकीय वैर प्रत्येक निवडणुकीत संघर्षमय हाेते. दाेघांची मैत्री असली तरी निवडणुकीत मात्र आराेप-प्रत्याराेपांच्या फैरीने वातावरण तापत असते. परंतु, या वेळी हाेणारी निवडणूक ही महाविकास आघाडीद्वारे लढविणार की स्वतंत्र लढणार यावर दाेन्ही नेते स्पष्ट बाेलत नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची माेठी पंचाईत झाली आहे.

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकातील अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाले. या वेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीद्वारे निवडणुका लढविल्या पाहिजे, असा सूचक इशारा वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांना दिला.

आरक्षणाकडेही इच्छुकांची नजर

शिनाेली आमाेंडी जिल्हा परिषद गटात 44 हजार 821 मतदार, घाेडेगाव-पेठ गटात 43 हजार 63 मतदार, कळंब-चांडाेली गटात 43 हजार 611 मतदार, पारगाव-अवसरी गटात 41 हजार 296, पिंपळगाव र्ते महाळुंगे गटात 41 हजार 340 मतदार आहेत. पंचायत समिती आमाेंडी गण 21 हजार 608 मतदार, शिनाेली 23 हजार 213, घाेडेगाव 2२ हजार ८३९, पेठ 20 हजार 22४, कळंब 22 हजार 64, चांडाेली 21 हजार 547, पारगाव 21 हजार 38, अवसरी 20 हजार 258, पिंपळगाव र्ते महाळुंगे 20 हजार 247 तर अवसरी खुर्द पंचायत समिती गणात 21 हजार 93 मतदार आहेत. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद गट आणि गणाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहे.

UP Election : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप !

इच्छुकांनी निवडणूक डाेळ्यांसमाेर ठेवून विवाह समारंभ, अंत्यविधी, दशक्रिया विधी, वाढदिवस, गावाेगावच्या यात्रांना हजेरी लावून भाषणे ठाेकण्याची कामे सुरू केली आहे. बैलगाडा शर्यती आणि गावाेगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू झाल्याने इच्छुक उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधण्याची आयती संधी प्राप्त झाली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत आरक्षण काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठा दिलासा : देशात गेल्या २४ तासात बाधित होणाऱ्यांपेक्षा तिपटीने बरे झाले !

गत निवडणुकीतील विजयी उमेदवार

गत पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विवेक वळसे पाटील, रूपाली जगदाळे, अरुणा थाेरात, तुलसी भाेर आणि शिवसेनेकडून देविदास दरेकर निवडून आले. पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गवारी, संताेष भाेर, उषा कानडे, आशाताई शेंगाळे, नंदकुमार साेनावले, इंदुबाई लाेहाेकरे, तर शिवसेनेचे शीतल ताेडकर, रवींद्र करंजखेले, अलका घाेडेकर आणि अपक्ष म्हणून राजाराम बाणखेले निवडून आले.

संजय राऊत यांना पाटबळ देण्यासाठी नाशिकमधून शिवसैनिक आज मुंबईत

या राजकीय नेत्यांनी कंबर कसली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, आदिवासी भागाचे नेते सुभाष माेरमारे, शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. अविनाश रहाणे, देविदास दरेकर, सुनील बाणखेले, अरुण गिरे, दत्ता गांजाळे, राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, उद्याेजक भाऊसाहेब सावंत पाटील, अशाेकराव बाजारे, रामशेठ ताेडकर, प्रवीण थाेरात पाटील, संताेष डाेके, सचिन बांगर, शिवाजी राजगुरू, भाजपच्या वतीने जिल्हा किसान माेर्चाचे संजयशेठ थाेरात, जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, तालुकाध्यक्ष डाॅ. ताराचंद कराळे, उपाध्यक्ष विजय पवार, संदीप बाणखेले, जागृती महाजन, गणेश बाणखेले, सुशांत थाेरात, रवींद्र त्रिवेदी, कैलास राजगुरव, काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष राजू इनामदार, अल्लू इनामदार, राजू बेंडे, जे. के. थाेरात, अ‍ॅड. बाळासाहेब बाणखेले, माजी सरपंच कैलास गांजाळे, विक्रांत भाेर आदी राजकीय पदाधिकारी सक्रिय झाले आहे.

Money Laundering : सचिन वाझे, पालांडे, शिंदेची आजपासून पुन्हा चौकशी

शेतकरी संघटना-किसान सभा एकत्र येणार

आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर आणि किसानसभा यांच्या समन्वयातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या काही जागा लढविण्याचा मनाेदय प्रभाकर बांगर यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button