पुणे : 12 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे : 12 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या
Published on
Updated on

पुणे : राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात पुणे विभागातील बारा उपजिल्हाधिकारी आणि दहा तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाचे सचिव माधव वीर यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. भूसंपादन अधिकारी-2 सातारच्या संगीता राजापूरकर यांची पुणे भूसंपादन क्रमांक -3 येथे बदली झाली आहे. डॉ. वनश्री लाभशेटवार यांची भूसंपादन -6 येथे बदली झाली आहे.

फलटणचे शिवाजी जगताप यांची सातारा भूसंपादन क्र. 2 येथे बदली करण्यात आली. विजय देशमुख यांची उपविभागीय अधिकारी, कडेगाव येथे बदली झाली. वाळवाचे (सांगली) उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर येथे बदली झाली आहे. सोलापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून, तर कोरेगावचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची उपजिल्हाधिकारी (रोहयो) रायगड येथे बदली झाली. सुभाष बागडे यांची पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

प्रवीण साळुंखे यांची नंदूरबार उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली. विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची उपजिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद येथे, तर शैलेश सूर्यवंशी यांची बीड येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य) म्हणून बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली.

दहा तहसीलदारांच्या बदल्या
तहसीलदारांमध्ये उज्ज्वला सोरटे यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली. सोनाली मेटकरी ह्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना तहसीलदारपदावर वाई या ठिकाणी बदली देण्यात आली. मीनल भामरे या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या, त्यांना तहसीलदार (रजा राखीव), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली देण्यात आली. अनिलकुमार होळकर यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली. लैला शेख यांची तहसीलदार, पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली करण्यात आली.

अजित पाटील यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची जबाबदारी देण्यात आली. अनिता देशमुख या प्रतीक्षेत होत्या. त्यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदार यांना राधानगरीच्या तहसीलदार म्हणून बदली देण्यात आली. माधवी शिंदे यांची तहसीलदार पन्हाळा येथे बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार, तर अर्चना कापसे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार कवठे महाकाळ येथे पदभार देण्यात आला.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news