

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात केलेल्या बॅनरबाजीवरुन टोलेबाजी केली.
त्यांनी 'बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये' या शब्दात निशाना साधला.
विशेष म्हणजे काका पालकमंत्री अजित पवार यांचे पुण्याच्या विकासात कसे योगदान आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये फलक युध्द रंगले आहे.
भाजपने फडणवीस यांना नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार हे बिरुद लावले असतानाच राष्ट्रवादीने कारभारी लयभारी या टॅगलाईन पवारांचे फलक लावून त्यास उत्तर दिले आहे.
आता या जाहीरात फलक उध्दात आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली असून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात 'विकासपुरुष' आणि 'शिल्पकार नव्या पुण्याचे' या टॅग लाईनखाली विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचे बॅनर शहरात झळकताना दिसले आणि ते पाहून हसायलाही आलं.
असे बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे.
बॅनर लावणार्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये' कदाचित फडणवीस साहेबांना याची काही माहितीही नसेल,
पण त्यांना खूष करण्यासाठी काही नेत्यांनी हा उद्योग केला असावा, असं वाटतंय!
गेल्या वेळी याच पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मताचं दान टाकलं, पण त्यांनी काय केलं याची नोंद ठेवण्यास पुणेकर कधीच विसरत नाहीत. भाजपचे सगळेच नेते 'स्मार्ट सिटी'चे ढोल पिटत होते ती स्मार्ट सिटी कुठंय?
महापालिकेत सत्ता असताना अनेक रस्त्यांची चाळण झालेली आणि फुटपाथ उखडलेले दिसतात. फक्त रंगसफेदी करून 'स्मार्ट सिटी' होत नसते.
भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, की पुणे हे नवं कधीच नव्हतं. पुण्याला मोठा आणि अभिमान वाटावा असा इतिहास आहे.
अशी टीका करत शरद पवार आणि अजित पवार यांनी पुण्यासाठी दिलेल्या योगदाची माहिती रोहित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : २००५ नंतर रंकाळा पुन्हा ओव्हर फ्लो