धुळे : तापी नदीत महिला आणि युवकाची अत्महत्या | पुढारी

धुळे : तापी नदीत महिला आणि युवकाची अत्महत्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा :

धुळे क्राईम : शिंदखेडा तालुक्यातील गिधाडे शिवारातील तापी नदीच्या पुलावरून एक महिला व युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पण तापी नदीला मोठा पूर असल्याने त्यांचा शोध घेण्यास अडचण आली आहे.

गिधाडे येथील पुलावर एका मोटारसायकल वरून एक महिला व युवक आला. या दोघांनी पुलाजवळ चपला काढून तापी नदीत उडी घेतली. हा प्रकार लांब असलेल्या मासे पकडणाऱ्या काही युवकांनी पहिला.

त्यानंतर शिंदखेडा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाबड हे पथकासह पुलावर पोहोचले. यावेळी बेवारस मोटारसायकलचा नंबर परिवहन विभागाला कळवण्यात आला. पण ऑनलाईन नंबर शोधण्यात अडचण आल्याने संबंधितांची माहिती मिळाली नाही.

दरम्यान हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर आला आहे. त्यामुळे नदीत उडी मारलेल्या दोघांना शोधण्यात अडचण आली आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : विहीर नव्हे राजवाडाच

Back to top button