पुणे : प्रवासाकरीता वाहन चोरी करणार्‍या तिघांना बेड्या | पुढारी

पुणे : प्रवासाकरीता वाहन चोरी करणार्‍या तिघांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच शहरात विविध ठिकाणी दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन सराईतांना अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून यावेळी अकरा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.

कोरोना काळातही स्टार्टअप्समध्ये भारत जागतिक स्तरावर टॉप-३ मध्ये : पंतप्रधान मोदी

उमेश विठ्ठल पवार (32, रा. मुंगशी वाळुज, ता बार्शी, जि. सोलापूर), साहील गुलाब ठोंबरे (18, रा. इंगळेनगर, आरंभ सोसायटी जवळ, भुगाव) आणि गणेश वाघमारे (20, रा. कदम वस्ती, राहुलनगर, शिवणे, ता. हवेती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

आझम खान यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अलंकार पोलिस ठाण्याच्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात तपास करत असताना गुन्ह्यात संशयीत आरोपी उमेश पवार याचे नाव निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने त्याचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीवरून तो पंढरपूर येथे असल्याचे अलंकार पोलिसांना समजले. त्यानुसार पथकाने पवारला पंढरपूर येथून ताब्यात घेतले. दरम्यान ठोंबरे आणि वाघमारे यांना देखील अटक करण्यात आली.

रीना मधुकर हिचं ग्लॅमरस अंडरवॉटर फोटोशूट❤️❤️ (Photos)

पवारने प्रवासाकरीता वाहनांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून अलंकार पोलिस ठाण्यातील सहा, हिंजवडी 2, वाकड आणि डेक्कन पोलिस ठाणे प्रत्येकी एक असे अकरा गुन्हे अलंकार पोलिसांनी उघडकीस आणले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे निरीक्षक संगिता पाटील, उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, अमंलदार सागर केकाण, निशीकांत सावंत, धिरज पवार, हरीष गायकवाड, नितीन राऊत यांनी ही कारवाई केली.

Back to top button