बिबवेवाडी भागात एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार | पुढारी

बिबवेवाडी भागात एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार

पुणे : पुढरी वृत्तसेवा

बिबवेवाडी भागात रविवारी रात्री टोळक्याने दहशत माजवून तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना घडली.
गोळीबार झालेला तरुण हा दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी सांगितले. वेळीच प्रसंगावधान राखल्याने तरुण थोडक्यात बचावला. अमित कैलास थोपटे (वय 32, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) असे गोळीबार झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सौरभ सरवदे, रूपेश सोनवणे ऊर्फ डीजे, नीलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबबात अमित थोपटे याने फिर्याद दिली आहे.

पुणे : प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

थोपटेचे दत्तवाडी भागात केस कटिंगचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी थोपटेचा आरोपींसोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. रविवारी (6 फेब्रुवारी) थोपटे, त्याचा भाऊ आणि मित्र रात्री अकराच्या सुमारास शिवशंकर सोसायटीच्या परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. टोळक्याने थोपटेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपी सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तूल थोपटेवर रोखले. पिस्तूल रोखल्यानंतर थोपटे, त्याचा भाऊ, मित्र तेथून पळाले. सरवदेने त्याच्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या थोपटेच्या दिशेने झाडल्या. त्यातील एक गोळी फायर झाली, तर दुसरी गोळी कट्ट्यात अडकली. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. थोपटेशी वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याला बाहेर भेटण्यासाठी बोलावले होते. थोपटेने आरोपींना भेटण्यास नकार दिल्यानंतर रविवारी रात्री आरोपी त्याच्या घराजवळ आले आणि दहशत माजवून गोळीबार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

नाशिक : एनडी पटेल लिंक रोडवर डांबर घेऊन जाणारा ट्रक पलटी, कर्मचारी जखमी

आझम खान यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पुणे : प्रवासाकरीता वाहन चोरी करणार्‍या तिघांना बेड्या

Back to top button