बक्षीस योजनेच्या लाभापासून 928 विद्यार्थी वंचित | पुढारी

बक्षीस योजनेच्या लाभापासून 928 विद्यार्थी वंचित

निकाल, प्रवेश प्रक्रिया लांबल्याने अर्ज करण्यास अडचणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून इतर कल्याणकारी योजनेंतर्गत खासगी शाळांमधील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे.

मात्र, यावर्षी निकाल व प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांना योजनेचे अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या. यातील अटी शिथिल करुनही अद्याप 928 विद्यार्थी लाभांपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

लतादीदींच्या निधनाच्या धक्क्यानं त्यांच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी सोडले प्राण

अर्ज भरण्यातील अडचणी शिथिल केल्यामुळे महापालिका क्षेत्रात दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालिकेच्या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले आहे.

कोरोना महामारीमुळे दहावी, बारावीची प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे नागरवस्ती विभागाकडून राबविलेल्या बक्षीस योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नव्हता.

‘लव्‍ह जिहाद’ दोषींना कठोर शिक्षा’ : उ. प्रदेशमध्‍ये भाजपचे संकल्‍प पत्र जाहीर

त्यामुळे संबंधित विभागाकडून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तसेच, नियम व अटींमध्ये शिथिलता आणली गेली.या योजनेच्या माध्यमातून दहावीत 80 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्याला दहा हजार, तर 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्याला 15 हजार रुपये बक्षीस दिले जाते.

तसेच बारावीत 80 टक्के गुण मिळविल्यास पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. या रकमेतून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यास मदत मिळते.

काँग्रेसकडून उद्यापासून भाजप कार्यालयासमोर आंदोलन : पटोले

त्यानुसार 2021-22 शैक्षणिक वर्षात दहावीतील 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या 1975 विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपये निधी लागला आहे.

तर, दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या 942 विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 41 लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

काँग्रेसने देशाचा विकास होऊ दिला नाही; पंतप्रधान मोदींचा पुन्हा हल्लाबोल

तसेच, बारावीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणार्‍या 665 विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यासाठी 99 लाख 75 हजार रुपये खर्च करण्यात आला.

तर बारावीच्या 928 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देणे बाकी आहे. त्यासाठी पालिकेला 1 कोटी 39 लाख 20 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर झाले.

त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना उशिरा प्रवेश मिळाले तर काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता.

Back to top button