शबाना आजमींनंतर जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

शबाना आजमींनंतर जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

पुढारी ऑनलाईन

कोरोनामुळे करण जोहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ रखडला आहे. चित्रपटामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आजमी यांना आधीच कोरोना संक्रमित आहेत. आता अभिनेत्री जया बच्चन यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही अभिनेत्री कोरोना संक्रमित झाल्याने चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड हंगामाचा रिपोर्ट्नुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या शूटिंग शेड्यूल २ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार होतं. पण, दोन्ही अभिनेत्री कोरोना संक्रमित झाल्याने या चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.

या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांशिवाय धर्मेंद्रदेखील आहेत. चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट दिसणार आहे. मागील वर्षी करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. आणि सांगितलं होतं की, पुन्हा एकदा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या खुर्चीवर वापसी करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Back to top button