४६ प्रभागांनुसार याद्या बनविण्याचे काम सुरु

४६ प्रभागांनुसार याद्या बनविण्याचे काम सुरु

२८ फेब्रुवारीपर्यंत होणार पूर्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबरीने आता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या 28 फेबु्रवारीपर्यंत तयार केल्या जाणार आहेत.

प्रभाग रचनेच्या आराखड्यावर 14 फेबु्रवारी दुपारी तीनपर्यंत हरकती व सूचना लेखी स्वरूपात समक्ष स्वीकारण्यात येणार आहेत. त्यावर 26 फेबु्रवारीला सुनावणी होऊन त्याचा अहवाल महापालिका 2 मार्चला आयोगास सादर करणार आहे. त्यानंतर आयोग त्यास अंतिम मंजुरी देणार आहे. त्यांची तारीख आयोगाने प्रसिद्ध केलेली नाही.

दरम्यान, आयोगाने प्रभाग रचनेनुसार विधानसभेच्या मतदार याद्या फोडून प्रभागनिहाय 46 याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या वरील मतदार संघांची मूळ मतदार यादी व पुरवणी यादी जिल्हाधिकार्यांकडून पालिका मागवून घेणार आहे. त्या याद्यातून प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. मतदार यादीतू वगळण्यात आलेल्या मतदाराच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारला जाणार आहे.

प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीतील बदलानुसार मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. याद्या बनविण्याचे काम संगणकाद्वारे केले जाणार असून, त्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचार्यांची नावे 8 फेब्रुवारीपर्यंत कळवावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news