इंदापूर : करेवाडी येथे ३२ एकर ऊस आगीत भस्मसात | पुढारी

इंदापूर : करेवाडी येथे ३२ एकर ऊस आगीत भस्मसात

वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि करेवाडी गावांच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ४) दुपारी दिड वाजेच्या सुमारास उसाला लागलेल्या आगीत तब्बल ३२ एकर पेक्षा अधिक ऊस जळून खाक झाला. आगीचे लोट मोठे असल्याने ही आग नियंत्रणात आणणे कठीण जात होते. मात्र त्यातूनही प्रयत्न करुन आठ ते दहा एकर ऊस वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी इंदापूर पोलिस दाखल झाले आहेत.

खासदार, आमदारांविरोधातील प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ!

या आगीत आप्पा धोंडिबा करे ६ एकर, गोरख रंगनाथ करे ३ एकर, भारत रंगनाथ करे ३ एकर , अलका मच्छिंद्र करे ३ एकर, माणिक पांडुरंग करे अडीच एकर,मोहन महादेव करे ४ एकर , छाया आप्पा करे ४ एकर, गणपत साधू करे आणि चंद्रकांत गणपत करे ४ एकर, बापू शेंडगे ४ एकर असा जवळपास ३२ एकर पेक्षा अधिक ऊस जळाला आहे. या आगीमुळे वरील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा

बुल्‍ली-सुल्‍ली ॲपचा राज्यसभेत मुद्दा उपस्‍थित

मध्य रेल्वे : विशेष पॉवर ब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द

पुष्पा स्टाइलमध्ये लालचंदन तस्करीचा प्रयत्न फसला 

Back to top button