चर्‍होली सर्वांत मोठा; तर मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती लहान प्रभाग | पुढारी

चर्‍होली सर्वांत मोठा; तर मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती लहान प्रभाग

सांगवी प्रभागात सर्वाधिक मतदारसंख्या व चार नगरसेवकांचा प्रभाग

पिंपरी : मिलिंद कांबळे : क्षेत्रफळानुसार माजी महापौर नितीन काळजे यांचा चर्‍होली प्रभाग क्रमांक 5 हा सर्वांत मोठा प्रभाग बनला आहे. तर, मोरेवस्ती व म्हेत्रेवस्ती प्रभाग क्रमांक 13 हा क्षेत्रफळानुसार सर्वात लहान प्रभाग आहे.

सर्वाधिक मतदार संख्येचा सांगवी प्रभाग क्रमांक 46 आहे. तेथे सन 2011 च्या जनगणनेनुसार 46 हजार 979 लोकसंख्या आहे. त्याच प्रभागात सर्वांत जास्त चार सदस्य निवडून येणार आहेत.

तर राज्यपालांचा नागरी सत्कार करू; संजय राऊतांचा खोचक टोला

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी (दि. 1) जाहीर केला. महापालिका भवन व सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयात प्रभागाचे नकाशे लावण्यात आले.

ते पाहण्यासाठी नागरिकांसह इच्छुक सकाळी दहापासून उपस्थित होते. मात्र, महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना उपलब्ध असल्याने अनेकांनी स्मार्ट फोनवरच प्रभागरचना पाहणे पसंत केले.

नाथसागर जलाशयात मृतावस्थेत आढळली महाकाय गर्भवती मगर

चारचे तीन सदस्यीय प्रभाग केल्याने पूर्वीच्या सर्वच्या सर्व 32 प्रभाग फोडण्यात आले आहेत. मुख्य भागावर लक्ष केंद्रीत करुन त्याला इतर भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच प्रभाग हे गोलाकार किंवा चौकोन क्षेत्रफळात तयार करण्यात आले आहेत.

त्रिसदस्यीय प्रभाग असल्याने प्रभागाचे क्षेत्रफळ घटले आहे. एकूण 46 प्रभागात चर्‍होली प्रभाग क्रमांक पाचचे क्षेत्रफळ सर्वांधिक आहे. त्या प्रभागात चर्‍होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, काळजेवस्ती, पठारे मळा, बुर्डे वस्ती, ताजणेमळा या भागांचा समावेश केला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आता होणार कमी

मात्र, तेथील एकूण लोकसंख्या 39 हजार 970लोकसंख्या आहे. तर, सांगवी प्रभाग क्रमांक 46 हा पूर्वीप्रमाणे चार सदस्य असणार आहेत. मात्र, प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असून, संपूर्ण सांगवीसह नव्या सांगवीतील सांगवी पोलिस ठाणे परिसरात जोडण्यात आला आहे. नगरसेवक संख्या अधिक असल्याने प्रभागातील लोकसंख्या सर्वांधिक आहे.

Back to top button