पुणे : प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा!

पुणे : प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला सूर बदलला आहे. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

याच वेळी जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्टीकडे मांडणार आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल, असेही जगतात यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news