‘हर घर दस्तक मोहिमे’त शहरातील 50 हजारांना कोरोना प्रतिबंधक लस | पुढारी

‘हर घर दस्तक मोहिमे’त शहरातील 50 हजारांना कोरोना प्रतिबंधक लस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या वतीने ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत 50 हजार 634 नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली आहे.

पुढील ३० वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही : संजय राऊत

महापालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या एक वर्षीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात 32 लाख 64 हजार 295 डोस देण्यात आले आहेत. दुसर्‍या लाटेनंतरही अनेक नागरिक लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

भिकार मालिका पाहणे बंद करा : विक्रम गोखले

तर काही नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत येण्याची सोय नसल्याने त्यांचे लसीकरण होत नसल्याचे समोर आले होते. त्यासाठी प्रशासनाने झोपटपट्टी व नागरिकांच्या घरी जाऊन लस देण्यासाठी मोहीम हाती घेतली.

फॉर्च्युनरमधून मद्याची तस्करी, 19 लाखांचा साठा जप्त ; दोघांना बेड्या

या मोहिमेला ‘हर घर दस्तक’मोहीम असे नाव देण्यात आले. त्याअंतर्गत आतापर्यंत 50 हजार 634 जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. त्यामध्ये 28 हजार 862 पुरुष व 21 हजार 772 महिलांचा समावेश आहे.

नाशिक : आठ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

दरम्यान, सरकारच्या वतीने कवच कुंडल अभियान राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत 84 हजार 493 जणांचे लसीकरण झाले. त्यामध्ये 51 हजार 247 पुरुष व 33 हजार 666 महिलांचा समावेश आहे.

कुर्ला : पूर्व द्रुतगती मार्गावर हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, चालक फरार

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत 75 तासांमध्ये 16 हजार 818 जणांना लस देण्यात आली. युवा स्वास्थ मिशन अंतर्गत महाविद्यालयांमध्ये लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 2 हजार 229 जणांना लस देण्यात आली आहे.

Back to top button