महिला सावकारी : पुण्यात चार महिला पोलिसांकडून जेरबंद | पुढारी

महिला सावकारी : पुण्यात चार महिला पोलिसांकडून जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा :

महिला सावकारी : बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या चार महिलांसह एकाला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सावकारी करणाऱ्या महिलांकडून तक्रारदार महिलांनी वडिलांच्या उपचारासाठी व्याजाने रक्कम घेतली होती. त्यानंतर तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये परतही केले.

पण, आणखी पैशासाठी या चार सावकारी करणाऱ्या महिलांनी तीन महिलांचे अपहरण केले. त्यांच्याकडून जबरदस्तीने सही केलेले धनादेश घेतले. याचबरोबर कोऱ्या स्टॅम्पवर सह्याही घेतल्या.

या अपहरण करणाऱ्या चार महिलांसह एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीर घरात प्रवेश, मारहाण, धमकाविणे, संगणमत करणे तसेच सावकारी कायदा 2005 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शगुफ्ता सैय्यद (४६, रा. साळुंखे विहार, वानवडी), फरीदा युसुफ खान (४२, रा. वानवडी गाव), आबीद शब्बीर साहा उर्फ डीजे (रा. खडकी), आसमा नईम सैय्यद (३५, भवानी पेठ), शहनाझ आसिफ शेख (४९, रा. महंमदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

याबाबत वैशाली वासुदेव कुलकर्णी (४५, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१४ ते ७ जुलै २०२१ दरम्यान घडला.

फिर्यादीने सावकाराला तब्बल १ कोटी ४३ लाख दिले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून वडिलांच्या उपचारासाठी व्याजाने पैशे घेतले होते.

व्याजापोटी फिर्यादी वैशाली व त्यांची बहीण उज्वला डंबळ यांनी संशयित आरोपी शगुफ्ता हिला २९ लाख २३ हजार, फरीदा हिला ७८ लाख ३२ हजार, आसमा हिल २९ लाख ४ हजार, तर शहनाझ हिला ६ लाख ६२ हजार असे एकूण १ कोटी ४३ लाख २३ हजार रूपये दिले होते.

तरी देखील जून महिन्यात वैशाली व त्यांच्या आईला सावकारी करणाऱ्या फरीदा खान हिने जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून तिच्या राहत्या घरी नेले होते. तेथे त्यांना डांबून ठेवून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली.

त्यानंतर फरीदाने व आबीद याने ७ जुलै रोजी वैशाली, त्यांच्या आईला व बहिणीला मार्केटयार्ड येथे बोलवून घेतले. तेथे शिवाीगाळ करून हाताने मारहाण करून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवले.

त्यानंतर त्यांना फिर्यादी वैशाली यांच्या विमाननगर येथील घरी आणले. तेथे त्यांच्या घरात बेकायदेशिर प्रवेश करून त्यांच्याकडून जबरदस्तीने कोर्‍या धनादेशावर व कोर्‍या स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या.

आमचे नाकेवाईक पोलीस खात्यात

आरोपी सावकारी करणाऱ्या महिलांनी आमची पोलीस खात्यात चांगली ओळख आहे, आमचे नातेवाईक पोलीस खात्यात आहेत, त्यांच्यामार्फत तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली.

आता या सावकारी करणाऱ्या महिलांविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : त्रिंगलवाडी किल्ल्याची सैर

Back to top button