भारतात वाढतेय के-ब्युटी ची क्रेझ… | पुढारी

भारतात वाढतेय के-ब्युटी ची क्रेझ...

पुणे: पुढारी वृत्तसेवा

देश कोणताही असो, माणसाच्या बाह्य सौंदर्याला नेहमी महत्व दिले जाते. भारतात ही प्रामुख्याने महिलावर्ग त्वचेची काळजी घेणे, सौंदर्य प्रसाधने वापरणे, मेकअप करणे या गोष्टींवर भर देतो. पण सध्या पुरूष ही याकडे लक्ष देताना पहायला मिळत आहे. भारतात आयुर्वेदीक आणि रासायनिक सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. परंतु सध्या के-ब्युटीला म्हणजेच कोरीयन ब्युटीला प्रसिद्धी मिळत आहे.

पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

मुळच्याच गोऱ्या असणाऱ्या कोरीयन लोकांमध्ये काहीवर्षांपासून ‘ग्लास स्किन’ ही संकल्पना वाढीस आली आहे. ज्यामध्ये फाउंडेशन, कॉम्पॅक्ट न वापरता त्वचेला आतून शुद्ध करण्यावर भर दिला जातो. त्वचा फक्त गोरीच नव्हे तर काचेसारखी स्वच्छ, मुलायम, नितळ आणि तजेलदार होण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यालाच ‘ग्लास स्किन’ म्हणतात.

Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी

समाज माध्यमांद्वारे कोरीयन सेलेब्रिटीजना फोलो करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोक त्यांच्या ग्लास स्किनकडे आकर्षित होत आहेत. हे सेलेब्रिटी कोरीयन सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करतात. यामुळे आपली त्वचा त्यांच्यासारखी व्हावी म्हणून ‘कोरीयन स्किन केअर रूटीन’ वापरले जात आहे. यामध्ये १० पेक्षा अधिक स्टेपस् असतात ज्यात विविध क्रिम्स् , सिरम, फेस पॅक वापरून त्वचेचे शुद्धीकरण करून चेहऱ्याचा मसाज ही केला जातो. यासाठी खास ग्रीन टी, ऑर्किड, सोयाबीन अश्या नैसर्गिक पदार्थांपासून बनविलेली कोरियन ब्रॅंडस् ची सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. या स्किन केअर रूटीन चे विडीयो समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून लोकं त्याला पसंती देत आहेत.

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विटमधून दिली महत्वाची माहिती

कोरियन सौंदर्य प्रसाधनांमुळे अर्थकारणात भर

अाशियातील अनेक देशांबरोबरच तसेच भारत आणि ब्रिटनमध्ये दक्षिण कोरीयातील सौंदर्य प्रसाधनांना मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या निर्यातीमुळे दक्षिण कोरीयाच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. ड्युटी फ्री दुकानांमध्ये सौंदर्य प्रसाधने कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहक पसंती देत आहेत.

Back to top button