यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पास आग - पुढारी

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पास आग

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा

हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टरीलरी प्रकल्पात आग लागली त्यामुळे बरेच नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. हा कारखाना सन २०११ पासून बंद अवस्थेत आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही

कोरडी मुंबई पुढील तीन दिवस गारठणार, निच्चांकी तापमानाची नोंद

यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाल्यापासून याकडे कोणाचेही लक्ष नाही केवळ काही तळमळीचे जेष्ठ सभासद यासाठी नेटाने लढत असून ही लढाई न्यायालयात चालू आहे. त्यामुळे गेली ११ वर्षे या कारखान्याचे लचके तोडण्यात येत असून, कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. ज्या बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला, त्यांची सुरक्षेची जबाबदारी असताना केवळ काही सुरक्षा रक्षकांच्या जीवावर ही करोडो रुपयांची संपत्ती सडत आहे.

पुणे : सातबारा कायमस्वरुपी बंद, आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार

सोमवारी सायंकाळी येथील डिस्टरीलरी प्रकल्पात आग लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षक यांनी माजी संचालक पांडुरंग काळे यांना याची कल्पना दिली. त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलास पाचारण केले. त्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. यावेळी थेऊर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी, एस पी ओ, कारखान्याचे सुरक्षा रक्षक यांचे  सहकार्य लाभले.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा क्रांतीचौकात विराजमान

Back to top button