कोरडी मुंबई पुढील तीन दिवस गारठणार, निच्चांकी तापमानाची नोंद | पुढारी

कोरडी मुंबई पुढील तीन दिवस गारठणार, निच्चांकी तापमानाची नोंद

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईकर सध्या चांगलेच गारठले आहेत. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 14 अंशांवर पोहोचले आहे. ही सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबईत इतकी थंडी यापूर्वी कधीच पडली नव्हती. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात ही मोठी घट झाली आहे. थंडीमुळे मॅर्निंग वॉक आणि व्यायामासाठी बाहेर पडणार्‍यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. बहुतांश लोक घरातच राहून थंडीपासून बचाव करत आहेत.

बदलते हवामान आणि थंडी पाहता पुढील काही दिवस वृद्ध आणि लहान मुलांना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Back to top button